ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी दारुची अवैद्यरित्या वाहतुक करणारे आरोपीवर प्रो. रेड

आरोपीचे ताब्यातुन फोरव्हीलर गाडी व देशी दारुसह एकुण ८ लाख ३४ हजारावर मुद्देमाल जप्त.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ११/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्षा चे पथक पोलीसआरोपीचे ताब्यातुन फोरव्हीलर गाडी व देशी दारुसह एकुण ८,३४,४००/-रु. चा मुद्देमाल जप्त. स्टेशन सिंदी (रेल्वे) ह‌द्दीत पेट्रोलिंग कारित असतांना गोपनीय बातमीदारा कडून खात्रीशिर माहीती मिळाली की, सिंदी (रेल्वे) येथे राहणारा शाहरुख ईस्माईल पठाण, वय २८ वर्षे, रा. वार्ड क. ७, बंगालपुरा, सिंदी (रेल्वे), ता. सेलु, जि. वर्धा हा त्याचे ताब्यातील सेव्हरलेट ट्व्वोरा कम्पनीची पांढऱ्या रंगाची फोरव्हीलर गाड़ी कमांक एम.एच. ४० ए.सी. ९७६६ मध्ये नागपुर येचुन अवैद्यरीत्या देशी दारुबाळगुन त्याची विक्री करणे करीता सिंदी (रेल्वे) ता. सेलू जिल्हा वर्षा येथे वाहतुक करून घेवून येत आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा, वर्चा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांनी सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, यांना देवून त्यांनी दिलेल्या सूचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानीक गुन्हे शाखेचे पथका मार्फत सेलडोह ते सिंदी (रेल्वे) कडे जाणाच्या रोडवरील ड्रामपोर्ट जवळ हळदगाव कडुन येणाच्या रोडने नाकेबंदी करुन प्रोव्हीशन रेड केला असता सदर आरोपी नामे शाहरुख ईस्माईल पठाण, वय २८ वर्षे, रा. वार्ड क. ७. बंगालपुरा, सिंदी (रेल्वे), ता. सेतु, जि. वर्धा हा त्याचे ताब्यातील सेव्हरलेट ट्व्हेरा कंम्पनीची पांढऱ्या रंगाची फौरवकीलर गाडी कमांक एम. एच. ४० ए.सी. ९७६६ मध्ये अवैधरीत्या विनापास परवाना देशी दारुची वाहुतक करीत असतांना जागीच मिळून आला. त्यांचे ताब्यातुन १) १४ खडयांचे खोक्यामध्ये लावणी संत्रा कंम्पनीच्या देशी दारुने भरलेल्या १८० एम.एल. च्या ६७२ सिलंबद शिशा प्रती २००/- रु प्रमाणे १,३४,४००/-रु, २) एक सेव्हरलेट टव्हेश कंम्पनीची पांढन्या रंगाची फोरव्हीलर गाडी कमांक एम.एच. ४० ए.सी. ९७६६ जुनी वापरती किंमत ७,००,०००/-रु असा एकूण जु. किंमत ८.३४,४००/-रु चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त केला

यातील आरोपी कमांक १ पास सदर देशी दारु कुठून खरेदी करुन आनली पाबाबत विचारले असता त्याने सदरचा माल हा ग्रिनव्हिलेज देशी दारु भट्टी, बडगाव जिल्हा नागपुर यांचे कडून खरेदी करून वानल्याचे सांगीतल्याने दोन्ही आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे कलम ६५ (अ),(ई), ७७(अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम ३(१)१८१, १३०/१७७ महाराष्ट्र वाहतुक अधिनीयमा अन्वये गुन्हा नोद करण्यात आला असून तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी बालाजी लालपालवाले, राहुल इंटेकर, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरगे, भूषण निषोट, अमोल नगराळे, मंगेश चावरे सर्वं नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये