ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
व्याहाड बूज. येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येतील रामभाऊ वासेकर यांच्या घरील गोठ्यात दिनांक 12 जुलै रोजी गोठ्यात शेळी बांधून असताना सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास गावामध्ये रामभाऊ वासेकर यांच्या गोठ्यात बिबट्या येऊन शेळी वर हल्ला करून शेळीला ठार केले.
मागील वर्षी सुद्धा व्याहाड बूज. येथील याच परिसरात बिबट येऊन घरात झोपेत असलेल्या गेडाम नामक महिलेवर हल्ला करून तिला बाहेर ओढत नेऊन ठार केले होते . आणि या वर्षी त्याच परिसरात बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार केल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावे. अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे