प्लास्टिकचा वापर कमी करणे काळाची गरज _ सच्चिदानंद शुक्ला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्लास्टिक हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे, परंतु आज प्लास्टिक मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. विद्यार्थी हे आपले भविष्य आहेत; त्यांना या गोष्टीची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून, आज १२ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नोकरी येथे “*प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक*” या विषयावर भाषण स्पर्धा ठेवण्यात आली.
यात एकूण १० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यापैकी प्रथम क्रमांक खुशी शेंडे, द्वितीय क्रमांक समीक्षा गायकवाड आणि तृतीय क्रमांक कस्तुरी शेंडे यांनी पटकावला. तसेच, अल्ट्राटेक माणिकगडच्या पर्यावरण विभागाचे श्री. सच्चिदानंद शुक्ला यांनी पर्यावरणावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यावर प्रश्नोत्तरे घेत योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले.
शाळेतील मुख्याध्यापक श्री. विनायक राठोड तसेच शिक्षक बाबू राठोड, नामदेव पवार यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व माणिकगड सी एस आर टीमचे आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तता दाखवली.