ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठ्ठल रखुमाई शोभा यात्रेतून दिला सामाजिक संदेश

लोकमान्य विद्यालयाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आषाढी एकादशी वारी व जनजागृती रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        आषाढी एकादशी उत्सवानिमित्त तसेच लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठल रखुमाई पालखीची शोभायात्रा तसेच विविध विषयावर जनजागृती रॅली अनेक भजन दिंडी, झेंडा पथक, लेझीम पथक बँड पथक घोष पथक, शेकडो विद्यार्थ्यांच्या पावल्या, माऊली माऊली नृत्य, वृक्षारोपण नेत्रदान रक्तदान नव साक्षरता साक्षरता संस्कार मूल्य शिक्षणावर आधारित स्लोगन सह हजारो विद्यार्थी व हजारो पांडुरंगाच्या भक्तांच्या सहभागाने संपन्न झाली.

विठ्ठल रखुमाई देवस्थान किल्ला वार्ड येथून सकाळी 10 वाजता पालखी शोभायात्रेला प्रारंभ झाला. पुरोहित्य धोपे महाराज यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बळवंतदादा गुंडावार, तहसीलदार राजेश भांडारकर, ठाणेदार योगेश्वर पारधी, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, मंडळाचे संयोजक चंद्रकांत गुंडावार उपस्थित होते.

शोभायात्रेमधील अनेक भजन दिंडी, विद्यार्थ्यांच्या पाउल्या, लेझीम झेंडा पथक चा उत्साह सर्वांचे लक्ष वेधत होते.

भगवान पांडुरंगाच्या जीवनावर आधारित नयनरम्य देखावे,अनेक रक्तदान, नेत्रदान, वृक्षारोपण, मूल्यसंस्कार यावर आधारित जनजागृती घोषवाक्य शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. हि शोभायात्रा विठ्ठल मंदिर, वाल्मीक चौक, जुना बस स्टँड, गांधी चौक या मार्गाने गेली.हजारो पांडुरंगाच्या भक्तासह व शाळेतील विद्यार्थ्यांच्या भक्तीच्या आनंदाने शोभा यात्रेला प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचे स्वरूप आले होते. जणू काही पंढरीच अवतरली. लोकमान्य विद्यालय तथा ज्ञानपीठ चे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.विठ्ठल रखुमाई मूर्तीचा मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते विठ्ठल रखुमाई मूर्तीचाअभिषेक पार पडला.

त्यानंतर ह.भ.प.सुवर्णा पिंपळकर यांचा राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला व ह.भ.प.भावना तनीरवार यांच्या हस्ते गोपालकला व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.शोभायात्रेच्या यशस्वीतेकरिता अशोक उपलंचीवार,गोपाल ठेंगणे, उल्हास भास्करवार, प्रकाश आईंचवार, प्रकाश पामपट्टीवर अमित गुंडावार, सचिन सरपटवार, रूपचंद धारणे, विशाल गावंडे, राजेश्वर मामीडवार,शरद राजूरकर,अनंता ताठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये