जनआक्रोश मोर्चामध्ये शेतकरी शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करा _ माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा, शेती वीज बिल माफ करावे, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडी च्या वतीने 14 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्च्यात देऊळगाव राजा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी शेतमजुरांना सहभागी करावे असे आवाहन माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी देऊळगाव राजा येथे महाविकास आघाडी च्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत केले,
11 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत महाविकास आघाडी तील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना ऊ बा ठा या तिन्ही घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.