ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर महसूल विभागाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनावर महसूल विभागाने कारवाई केली असुन वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

सदर कारवाई शहरातील टप्पा परिसरातील पिपराडे सभागृह परिसरात गुलमोहर पार्क जवळमहसूल विभागाच्या गौण खनिज विशेष पथकातर्फे दिनांक 12 रोज शनिवारला पहाटेच्या 3.45 मिनिटांदरम्यान करण्यात आली. एम एच 33 44 85 या क्रमांकाच्या हायवा वाहना तर्फे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली.

सदर हायवा हा चंद्रपूर येथील प्रदीप तुराणकर यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ अधिकारी अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी खुशाल मस्के यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये