ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री माता महाकाली मंदिर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी महाआरती व महाप्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर व श्री महाकाली माता महोत्सव समीतीची आयोजन 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहराची आराध्य दैवत श्री माता महाकाली मंदिर येथे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणा तसेच त्यांना निरोगी, दीर्घ व यशस्वी आयुष्य लाभावे यासाठी विशेष महाआरती व महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगर आणि श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्थानिक भजन मंडळांनी सादर केलेल्या देवी स्तुती, अभंग आणि गजरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. जय माता महाकाली च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

   यानंतर माता महाकालीची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. पुजार्यांनी वेदमंत्रोच्चारात देवीसमोर दीप प्रज्वलित करून आमदार किशोर जोरगेवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत राहावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि ते जनतेची सेवा अधिक जोमाने करू शकावेत, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

             आरतीच्या वेळी मंदिरातील दिव्यांच्या प्रकाशात आणि घंटानादात निर्माण झालेल्या पवित्र वातावरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. अनेकांनी आरतीत सहभागी होत आमदारांच्या आरोग्यासोबतच शहराच्या प्रगतीसाठीही प्रार्थना केली. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महिला मंडळे, युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये