ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारू वाहतुक करणाऱ्यावर धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  हकिकत याप्रमाणे आहे कि, दि 12/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन सेवाग्राम परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे नागपुर ते वर्धा महामार्ग बायपास वरील मॉं कि रसोई रेस्टॉरंट जवळ सापळा रचुन एका पांढ-या रंगाची MARUTI RITZ ZXI BS IV. कार क्र. MH-19/AX-4672 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता.,

सदर कारमध्ये एकुण 20 खरर्ड्याचे खोक्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा माल मिळुन आल्याने आरोपी कार चालकास विचारपुस केली असता, सदर दारूचा माल हा त्याने वडगाव जिल्हा नागपुर ग्रा. येथील साकी बार मधुन अवैधरित्या खरेदी केल्याचे सांगितल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून कार चालकाचे ताब्यातुन 1) एक पांढ-या रंगाची MARUTI RITZ ZXI BS IV. कार क्र. MH-19/AX-4672, कि. 7,50,000 रू .2) 16 खरर्ड्याचे खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या 756 सिलबंद शिशा कि. 2,42,100 रू, 3) 3 खरर्ड्याचे खोक्यात 72 सिलबंद बिअरचे डब्बे कि 25,200 रू, 4) 01 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या 100 सिलबंद शिशा कि. 10,000 रू व एक कि-पॅड मोबाईल कि. 2,000 रू असा जु.कि. 10,29,300 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी नामे 1) रवि दिलीप देशमुख, वय 36 वर्ष, रा. गौरी नगर सांवगी मेघे वर्धा, 2) वडगाव जिल्हा नागपुर ग्रा. येथील साकी बार चा मालक/चालक यांचेवर पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, गजानन दरणे, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक, मुकेश ढोके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये