ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी हायस्कूल येथे बाल गुन्हेगारी व महिला सुरक्षेविषयी कार्यशाळा संपन्न 

जिवतीचे नवनियुक्त ठाणेदार यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- बालकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे प्रशासन आणि पालकवर्ग यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी हसतखेळत अन् उपक्रमशील, मूल्यशिक्षण देणे, सुरक्षित सामाजिक वातावरण मिळवून देणे, अतिशय गरजेचे आहे.

सर्वात महत्त्वाचे वय नव्हे, तर वर्तन अपराधाचे खरे कारण ठरते. गुंडगिरी करणे, चुकीच्या संगतीत राहणे, अश्लील भाषा वापरणे, रात्री- अपरात्री दुचाकी फिरवणे, मुलींची छेड काढणे, मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, पालकांचे न ऐकणे, शाळेतून पळून जाणे अशा गोष्टी मुलांना गुन्हेगारीच्या वाटेवर नेतात. काही वेळा शाळा टाळणे वा घरातून पळून जाणे, हे गुन्हेगारी प्रकारात मोडत नसले, तर अशा वर्तणुकीने मुलांची वाटचाल गंभीर गुन्ह्यांकडे होते.

सध्या काही ठिकाणी लहान वयाच्या मुलांकडून हेतुपुरस्सर गुन्हे करवून घेण्याचे प्रकार उघड होत आहेत. अशा बालकांना बालसुधारगृहात पाठवले जाते. दोन – तीन महिन्यांत ते सोडले जातात आणि पुन्हा त्यांच्याकडून गुन्हे घडवून घेतले जातात, ही चिंतेची बाब आहे.

प्रशासन स्तरावर बऱ्याच उपायोजना सुरू आहेत. पण त्या उपाययोजना उपयुक्त ठरत नसल्याने त्या उपाययोजनांवर प्रशासनाने पुनर्विचार करणे गरजेचे आहे. कारण बालकांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी ठरत नाही. त्यांच्यासाठी प्रभावी मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षणाची गोडी निर्माण करणे आणि सुरक्षित सामाजिक वातावरण मिळवून देणे आवश्यक आहे. तेव्हाच बालगुन्हेगारीला कुठेतरी आळा बसेल, असे मत बालाजी हायस्कूल येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत जिवती पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार प्रवीण जाधव यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वाढती बाल गुन्हेगारी व महिला सुरक्षा संबंधी कायदेविषयक माहिती दिली तसेच स्पर्धा परीक्षेविषयी माहिती देऊन आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नभिलस भगत, शेंडे, प्रकाश पवार, इंदल आडे, बेंबडे,वाघमारे व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये