ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फार्मर आयडी असेल तरच मिळणार नुकसान भरपाई

वेळीच काढा आयडी ; तहसीलदार यांचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यात आठवड्यात झालेल्या पावसाने, तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल अशा शेतकऱ्यांना मिळणार असल्याने, शेतकऱ्यांनी ती त्वरित काढून घ्यावी असे आव्हान महसूल विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकार द्वारे, शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आवश्यक आहे. याबाबत सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी तालुक्यात शिबिर लावून जनजागृती केली होती . आजही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र अजूनही अनेकांनी फार्मर आयडी काढलेली नाही. परिणामी नुकताच आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यांना मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावी असे आव्हान तालुका प्रशासनाने केले आहे.

      गोसिखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडल्याने तालुक्यातील काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्याचे काम मंडळ अधिकारी, कृषी विभागा मार्फत सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना हा लाभ मिळणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावी.

                 प्रांजली चिरडे, तहसीलदार सावली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये