13 जुलै रोजी गायत्री परिवाराचे वतीने शहरात शताब्दी वर्षानिमित्ताने ज्योती कलश यात्रेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गायत्री परिवार हरिद्वार शताब्दी वर्ष निमित्ताने श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भव्य ज्योती कलश यात्राbकाढण्यात येणार आहे या सोबतच पंचकुंडी यज्ञ दीप यज्ञ व सत्संगचे मोठ्या प्रमाणात आयोजन दिनांक 13 जुलै रोजी करण्यात आलेले आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गायत्री परिवाराचे वतीने करण्यात आलेले आहे.
याबाबत सविस्तर असे की गायत्री परिवाराचे पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या प्रेरणेने युग निर्माण योजना साठी संकल्प करण्यात आला व 1926 पासून आज पर्यंत या ठिकाणी अखंड दीप प्रज्वलन सुरू असून याला 2026 मध्ये शतक झाल्यामुळे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येत असून ही अखंड ज्योत भारतासह जगातील 150 देशांमधून भ्रमण करणार आहे. *सदर ज्योती कलश यात्रेचे आयोजन शहरात दिनांक 13 जुलै रोजी करण्यात आले असून पार्श्वनाथ भवन मध्ये पंचकुंडी यज्ञ सोबतच दीप यज्ञ व सत्सग चे आयोजन सोबत विद्या आरंभ संस्कार, गर्भसंस्कार, अन्नप्राशन संस्कार करण्यात येणार आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन गायत्री परिवाराचे वतीने करण्यात आलेले आहे.
सदर सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वितेसाठी गायत्री परिवाराचे रामेश्र्वर गुप्ता, गोपाल व्यास, मनिष काबरा, डॉ. भगवान तोष्णीवाल, अनिल गुप्ता, विनोद धन्नावत, लाहोरे सर, राजकुमार काबरा, प्रयत्न करत आहेत, सदर पंचकुंडी यज्ञ व दीप यज्ञ साठी हरिद्वार येथुन गायत्री परिवाराचे निस्सीम भक्त हरीश व्यास हे शहरात आलेले आहेत,