ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम हेच यशाचे गमक : प्रदीप पुल्लरवार

स्व.वामनराव गड्डमवार स्मृतिदिनी गुणवंत विद्यार्थ्याचा सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम या दोन गोष्टी एकत्र येऊन तुम्हाला यशाकडे घेऊन जातात.आत्मविश्वास तुम्हाला प्रेरणा देतो आणि कठोर परिश्रम तुम्हाला ते यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेले साधन देतात. याचा अर्थ असा की,जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि कठोर परिश्रम करतात तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळते असे प्रतिपादन सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदिप पुल्लरवार यांनी स्व. वामनराव गड्डमवार यांचे स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत गुणवंताचा सत्कार या कार्यक्रमाप्रसंगी केले.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे संस्थापक अध्यक्ष वामनराव गड्डमवार यांच्या 22 व्या स्मृतीदिनानिमित्य वर्ग 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम (दि. 11) रोजी आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील प्रथम इयत्ता 10 व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थी तन्मय किशोर वाळके, भाग्यश्री दुमाजी गंडाटे, अश्वीनी पुरुषोत्तम लाटेलवार, आरती आनंदराव गोहणे इयत्ता 12 वा कला विभागातील प्रविणा रविंद्र आडेपवार, शितल शालीक गुरनूले, अक्षया अतुल मांदाडे विज्ञान विभागातील स्वाती उमेश झरकर, रेहानी प्रविण कोहळे, चिरंजीवी पुंडलिक चौधरी, इयत्ता 12 वा वाणिज्य विभागातील ओमकार श्रीकृष्ण राऊत, कपिल किशोर कंकलवार, डिंपल मनोज चौधरी आदि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.

यावेळी मंचावर भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदिप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगिडवार, नगराध्यक्ष साधनाताई वाढई, उपनगराध्यक्ष संदिप पुण्यपकार, सहा. पोलीस निरिक्षक सचिन मुसळे, गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे, राष्ट्रपिता म. गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. चंद्रमौली, विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली, कुनघाडा, भेंडाळा, मारोडा, बोथली चे सर्व मुख्याध्यापक तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये