घुग्घुस बाजार क्षेत्रात शुल्क फलक लावण्याच्या मागणीवरील माहितीची विनंती

चांदा ब्लास्ट
घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना बाजार व्यवस्थापन अधिक पारदर्शक होण्यासाठी गुजरी व आठवडी बाजार क्षेत्रात शुल्क निर्धारण फलक लावण्याची मागणी करणाऱ्या निवेदनाबाबत लेखी माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.
प्रणयकुमार बंडी यांनी दि ४ जुलै २०२५ रोजी नगर परिषद कार्यालयात सादर केलेल्या निवेदनात बाजारातील शुल्क दरांचे फलक लावणे, अवैध प्रवेश रोखणे आणि जादा शुल्क वसूल करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईसंदर्भात स्पष्ट माहिती देणारे फलक उभारण्याची मागणी केली होती.
या मागणीमुळे बाजार परिसरातील लघु व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल तसेच नागरिकांच्या मनात नगर परिषदेबद्दल विश्वास वाढेल, असे मत व्यक्त करत त्यांनी या मागणीवर लेखी माहिती द्यावी, अशी विनंती मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगर परिषदेने याप्रकरणी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.