गुरुपौर्णिमेनिमित्त पंचशील बौद्ध विहार बांधकामास दान
स्मृतीदिनाचे समाजहितार्थ रूपांतर

चांदा ब्लास्ट
घुग्घुस :- गुरुपौर्णिमेच्या पावनदिनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत भालर येथील किरण दुधगवळी यांनी आपल्या स्व. संध्या सुरज लोहकरे व स्व. विशाल भारत लोहकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंचशील बौद्ध विहार, घुग्घुस येथे सुरू असलेल्या विहाराच्या नव्या बांधकामासाठी रु. 20,000/- (प्रत्येकी 10,000/-) चे दान दिले.
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस अंतर्गत या विहाराचे काम सुरू असून, समाजातील नागरिकांनी व्यक्तिगत समारंभांना फाटा देत सामाजिक कार्यासाठी निधी द्यावा, अशी संकल्पना अध्यक्ष सुरेश पाईकराव, कोषाध्यक्ष हेमंत पाझारे आणि कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी मांडली आहे. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तिसरा दिवस, गृहप्रवेश किंवा स्मृतीदिन अशा प्रसंगी मोठा खर्च न करता त्याचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे ते आवाहन करतात.
या अभिनव संकल्पनेमुळे नागरिकांमध्ये हळूहळू जागरूकता निर्माण होत असून, विहार बांधकामासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
सुरेश पाईकराव, हेमंत पाझारे आणि चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी किरण दुधगवळी यांचे समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.