ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेकानंद विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात दिनांक ०७ जुलै रोजी विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तथा शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम विद्यालयाच्या सभागृहात पार पडला.

या प्रसंगी मंचावर विवेकानंद ज्ञानपीठ (कॉ.) वरोरा या संस्थेचे अध्यक्ष मान.पुरुषोत्तमजी स्वान, संस्थेचे सचिव मान.अमनजी टेमुर्डे आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बांदूरकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात साधारणपणे २५ विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वृंद सौ.आशा गावंडे, श्री.दयाकर मग्गीडवार, श्री. तुकाराम पोफळे, श्री. संजय आगलावे, श्रीमती मेघा ताजने तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विनोदबाबू गावंडे, रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये