भारतीय जनता पार्टी तुकुम(उत्तर) मंडळ, बाजार मंडळ तसेच सिव्हील मंडळाची “देवाभाऊ जनकल्याण सप्ताह” निमित्त नियोजन बैठक उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात “देवाभाऊ जनकल्याण सप्ताह” अंतर्गत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांची आखणी करण्यासाठी दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी तुकुम (उत्तर) मंडळाची बैठक उत्तर भाषीय सभागृह तुकूम चंद्रपूर येथे तसेच सिव्हील मंडळाची बैठक सौ छबुताई वैरागडे यांचे कार्यालय सिव्हील लाईन चंद्रपूर येथे व बाजार मंडळाची बैठक मा. आ. किशोरभाऊ जोरगेवार यांचे कार्यालय चंद्रपूर येथे नियोजन बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष मा. इंजि .श्री सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी माजी उपमहापौर श्री संदीपजी आवारी, श्री अनिलजी फुलझेले, भाजपा उपाध्यक्ष रवींद्रजी गुरनुले, माजी मंडळ अध्यक्ष विठ्ठलराव डुकरे, तुषारभैय्या सोम, श्री प्रमोदजी शास्त्रकार, विधानसभा विस्तारक श्री प्रवीणजी गिलबिले, युवा नेता यश बांगडे, माजी नगरसेविका सौ. वनिताताई डुकरे, सौ. शीतलताई गुरनुले, सौ. मायाताई उईके, सौ. पुष्पाताई उराडे, सौ. मायाताई मांदाडे, सौ. शिलाताई चव्हाण, सौ. मंजुश्रीताई कासनगोट्टूवार, प्रज्ञाताई बोरगमवार, श्रीकांतजी भोयर, चंदनभैय्या पाल, आमीनजी शेख, सतीश तायडे, मधुकरजी आडपवार, पुरुषोत्तमजी राऊत, सौ. सुवर्णाताई लोखंडे, बबनराव अनमूलवार, अरविंद मडावी, पुरुषोत्तम सहारे, सुनील डोंगरे, सौ. धामणगे काकू, सौ. भावनाताई नागोसे बाजारमंडळ अध्यक्ष इंजि. श्री सुभाष अदमाने , सिव्हील मंडळ अध्यक्ष रवी जोगी, छबुताई वैरागडे तसेच सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष इंजि.श्री सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांनी “जनकल्याण सप्ताह” संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाजपा उपाध्यक्ष श्री रवींद्रजी गुरनुले यांनी केले. सूत्रसंचालन तुकुम मंडळ अध्यक्ष इंजि. स्वप्नील विठ्ठलराव डुकरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री सतीशजी तायडे यांनी केले.
तुकुम मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष इंजि मा. सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, तुकुम मंडळ अध्यक्ष इंजि. श्री स्वप्नील विठ्ठलराव डुकरे, बाजारमंडळ अध्यक्ष इंजि. श्री सुभाष अदमाने व बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्षा अॅड. सौ. सारिका संदूरकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.