अखेर जेरबंद केलेल्या अस्वलीचा मृत्यू
प्रकृती अस्वस्थतेमुळे केले होते जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आयुध निर्माणी क्षेत्रात प्रकृती अस्वस्थतेमुळे फिरत असलेल्या अस्वलाला वन विभागाने दिनांक ७ रोज सोमवारला जेरबंद केले तिचेवर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे उपचारासाठी नेले असता आज पहाटे दरम्यान त्या अस्वलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
डब्लू पी एस परिसरात सहा वर्ष वयाची अस्वल आपल्या पाच महिन्याच्या दोन पिल्यासह वास्तव्यास असल्याची माहिती होती मात्र तिची प्रकृती अस्वस्थतेमुळे तिच्या हालचाली कमी होत्या यामुळे भद्रावती टीम ने रेस्क्यू ऑपरेशन करून त्या सहा वर्षाच्या अस्वलीला जाळ्याच्या माध्यमातून जेरबंद केले त्यावेळेस पाच महिन्याचे दोन पिल्ले त्याच परिसरात होते.
वन अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम अस्वलीला भद्रावती येथील पशुवैद्यकीय येथे उपचार केला त्या नंतर चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आज पहाटे दरम्यान अस्वलीचा मृत्यू झाला ही कारवाई वनपरिचित्र अधिकारी किरण धानकुटे क्षेत्र अधिकारी विकास शिंदे सह इतर कर्मचाऱ्यांनी केली.