ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तब्बल 24 वर्षानंतर आले वर्गमित्र एकत्र

सावलीच्या सुरभी कृषी विद्यालयात स्नेहमिलन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली येथील सुरभी कृषी विद्यालयात 1997 ते 99 या वर्षात शिक्षण घेतलेले वर्गमित्र तब्बल 24 वर्षानंतर एकत्रीत येवून स्नेहमिलन सोहळा साजरा केला.

सन 1997 ते 99 या वर्षात सुरभी कृषी विद्यालयात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यानंतर अनेकांनी नौकरी स्विकारली तर काहीनी आपला व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. नौकरी व व्यवसायीक झाल्याने वर्गमित्रांच्या भेटीगाठी होणे शक्य नव्हत्या त्यामुळे सर्व वर्गमित्रांच्या भेटीगाठी होण्यासाठी सावलीच्या सुरभी कृषी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सोहळयात सर्व वर्गमित्र आवर्जुन उपस्थित झाले आणि 24 वर्षानंतर सर्वांची भेट झाल्याने आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्गशिक्षक अनिल पिसे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन याच विद्यालयातून शिक्षण घेतलेले व सध्या पोलीस अधिकारी असलेले विरसेन चहांदे हे होते. या कार्यक्रमाप्रसंगी अनेकांनी आपली व्यथा व अनुभव सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष दुधे, मिलींद दुधे, तलाश गेडाम, जयंत दुर्गे, दिलीप बांबोळे यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये