ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर मध्ये एम एच टी -सी ई टी 2024-25 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 27 जुन रोजी पार पडला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग. शि. प्र.मं. गडचांदूर चे संचालक तथा प्राचार्य (राजीव गांधी इंजि. कॉलेज, चंद्रपूर ) मा. डॉ. अनिलराव चिताडे, होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ग. शि. प्र.मं. चे सचिव मा. धनंजय गोरे , कनिष्ठ महाविद्यालचे प्राचार्य मा. साईनाथ मेश्राम उपप्राचार्य मा. प्रफुल्ल माहुरे तसेच विज्ञान विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य माहुरे यांनी केले संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रगती आगे यांनी केले कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. अनिलराव चिताडे यांनी वर्ग 12 वी विज्ञान च्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी उपलब्ध संधीबद्दल आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये