ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ.मनोज कायंदे घेतली बांधावर न्याहारी..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आपल्या अतिशय साधी राहणे आणि जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे चर्चेत असणारे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे हे वेगवेगळ्या सामान्य घटनेने चर्चेत असतात. 27 जून वार शुक्रवार अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीच्या सर्वे करत असताना त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संवाद साधून समस्या सोडविण्याचे आदेश दिले सरसकट नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी वरच्या स्तरावर बोलणे केले हे सगळं सुरू असताना सकाळी आठ वाजेपासून घराच्या बाहेर पडलेले आमदार एक वाजता सहज मजाक मध्ये बोलले मला भूक लागली आहे.

शेजारी असलेल्या मायमाऊलीने लगेच टोपली मधून पाच-सहा भाकरी काढल्या ठेचा लोणचं आमदार साहेबांच्या हातावर टेकविल्या आमदार साहेब तात्काळ तेथेच बांधावर न्यारीचा आनंद घेतला. आणि तात्काळ पुढील गावाच्या बांधावर जाण्यासाठी पुढे निघाले आमदार साहेबाचा हा साधेपणा बघून सामान्य लोक आवक होत आहे सामान्य चा आमदार अशी प्रतिमा जोपासत आमदार साहेब नक्कीच मतदार संघाचा विकास करतील ही अपेक्षा जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात बळावली आहे. अधिकाऱ्यांचा ताफा शोभत असल्याने अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली आमदार साहेबांसोबत चिखल तुडवत शेतात जावं लागलं मात्र या कृतीमुळे शेवटच्या घटकातला व्यक्तिमत्व सुखावून गेला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये