सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष राजर्षी शाहू महाराज – रवींद्र मुप्पावार
विश्वशांती विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
आरक्षण देणारा पहिला राजा,जे आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोठावणारा राजा,कला,क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा,अंधश्रद्धा,कर्मकांडे,दैववाद यावर प्रहार करणारा राजा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा अशा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होते असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी व्यक्त केले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक शिक्षक धनंजय गुरनुले यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,किशोर संगीडवार,शेखर प्यारमवार,राहुल आदे उपस्थित होते.
जयंतीदिनी कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक भुजंगराव आभारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाचे मोलाचे सहकार्य लाभले.