भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब उमटविणारा कठपुतली ( बाहुली) च्या खेळाणे भाराविले ऊर्जानगर वासी
आधुनिक काळात सुध्दा बहुलीची कला जिवंत ठेवण्याचे प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ऊर्जानगर यांच्या स्तुत्य उपक्रम
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ऊर्जानगर च्या आयोजित कार्यक्रमात राजस्थान वरून आलेले लोककलावंत सुरेश भैय्या जैन यांनी बाहुली कला सादर केली. या बाहुलीच्या सादरीकरणात त्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषेने ऊर्जानगर वाशी भारावून गेले होते. या कार्यक्रमात उपस्थितांनी प्रथमच हा बाहुलीचा खेळ बघितल्याने जैन यांच्या कला सादरीकरणाची वाहवा केली.
भारतीय संस्कृती ही लोककलांमध्ये प्रतिबिंबित आहे. याच कलेमध्ये कठपुतली ( बाहुली )कला सुध्दा खूप प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीची वाहक असलेली ही कला मनोरंजन करण्यासोबतच नृत्य , अभिनय, शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे.
रंगीबिरंगी कागद, कपडे, रबर, लाकूड व प्लास्टिक वापरून तयार केलेल्या आकर्षक बाहुल्या धाग्यांच्या सहाय्याने त्यात जिवंतपणा आणले जाते.
धाग्यांना पकडून बोटांच्या सहाय्याने एकाचवेळी अनेक बाहुल्या गाण्याच्या तालावर लीलया नाचाविने सहज अवगत होते असे नाही. यासाठी अनेक वर्षाच्या सरवानंतर यात प्रावीण्य संपादन करून हा बाहुल्यांचा खेळ साकारले जाते. हे लोककलावंत आजच्या आधुनिक काळात सुध्दा ही कला जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत म्हणून हे विशेषत्वाने भारतीय संस्कृतीचे रक्षण करते आहेत.
आधुनिकतेचे फॅड बोकाळले असताना भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब उमटविणारा सुंदर कार्यक्रम आयोजीत करण्या करिता मंडळाचे अध्यक्ष श्री अमोल कोल्हे उपाध्यक्ष श्री प्रमोद राठोड सचिव श्री रोहित पिट्टलवार वरिष्ठ सल्लागार सतिश कंदिवार, धनराज सपकाळे,संदीप केदार,विजय भोयर,अमोल मोंढे,दिवाकर बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचेसर्वत्र कौतुक केले जात आहे.