ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात “संविधान गौरव महोत्सव” साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात 12 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अपर्णा धोटे, प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. कुंदन शहारे, प्राध्यापक डॉ. अजय दहेगावकर व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कुलदीप भोंगळे उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून करण्यात आली.

सर्वप्रथम प्रास्ताविकेमध्ये प्रा. कुलदीप भोंगळे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजन मागचा हेतू स्पष्ट केला.

तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. कुंदन शहारे यांनी संविधाना विषयी व त्यामध्ये असलेले अधिकार आणि कर्तव्य या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. अजय दहेगावकर यांनी संविधान निर्मिती विषयी माहिती दिली.

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अपर्णा धोटे यांनी संविधानांनी दिलेले अधिकार स्वातंत्र्य, समता, बंधुता व याविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये कोमल जंगापल्ली, तेजस्विनी आंबिलकर, अभिजीत सेन आणि अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. कुलदीप भोंगळे तर आभार प्रदर्शन प्रा. Lt. सचिन श्रीरामे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक शशिकांत सीत्रे, प्राध्यापक प्रवीण कुमार नासरे व श्री प्रमोद तेलंग यांनी अथक परिश्रम घेतले.

 या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये