गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाची विशेष सभा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हाशाखेची विशेष सभा स्थानिक परिश्रम भवनात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.शाखेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत लेनगुरे, यांची उपस्थिती होती. प्रथमतः मॉ जिजाऊ साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर यांनी प्रस्तावना केली. प्रस्तावनेत त्यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाची माहिती विस्ताराने मांडली. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण किलनाके आणि वर्षा पडघम यांनी या वर्षात घेण्यात येत असलेल्या प्रस्तावित कार्यक्रमांवर प्रकाश टाकला.
दरवर्षी प्रमाणे पुरस्कार सोहळा आयोजन करण्यात येणार असून चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. झाडीबोलीतील कविता संग्रह तसेच प्रमाणभाषेतील काव्यसंग्रह, इतर लेखन व उत्कृष्ट झाडीपट्टी कलाकार या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन करून चर्चा करण्यात आली. येत्या २२ जून रोजी शाखेचा वर्धापन दिनानिमित्त कवी संमेलन घेण्याबाबत निश्चित करण्यात आले तसेच येत्या १ जुलै रोजी झाडीपट्टी शब्दसाधक दिन साजरा करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. झुंजुंरका या झाडीबोली प्रतिनिधिक कवितासंग्रह यावर चर्चा करण्यात आली. झाडीबोलीचा झेंडा सर्वदूर पोहचवा असे आवाहन यावेळी बंडोपंत बोढेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी उपेंद्र रोहनकर यांनी केले तर आभार कवी गजानन गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कवयित्री प्रेमीला अलोणे, प्रतीक्षा कोडापे, खेमराज हस्ते ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.