ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय परिसरात वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल लाईन देऊळगाव राजा येथे आज गुरूवारी सकाळी ११ वाजता पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी श्री.के.पी.खांडेभराड अध्यक्ष सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल कालनी देऊळगाव राजा,श्री.बळीराम जिजेबा मापारी मामा अध्यक्ष देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, गोविंद भिकानाथ बोरकर सचिव देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा श्री प्रकाश राधाकिसन अहिरे संघटक उपस्थित होते.