महात्मा गांधी महाविद्यालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली येथील महिला तक्रार निवारण समितीसाठी JCI चंद्रपूर गरिमा शाखेच्यावतीने सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देणारा हा स्तुत्य उपक्रम महाविद्यालय स्तरावर सकारात्मक पाऊल ठरला आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन JCI गरिमा चंद्रपूरच्या अध्यक्षा जेसी स्वाती पुगलिया, जेसी वृषाली पिंपळकर आणि जेसी गौरी लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रमौळी सर अध्यक्षस्थानी होते. त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करत उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि सांगितले की, “महाविद्यालय विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक सुविधा आणि सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर राहील.”
कार्यक्रमावेळी महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. महानंदा भाकरे, समन्वयक डॉ. किरण बोरकर, डॉ. राजश्री मार्कंडेवार, डॉ. रागिनी पाटील, डॉ. प्रेरणा मोडक, डॉ. स्मिता राऊत आणि राजश्री बांबोले मॅडम उपस्थित होत्या.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित सर्वांनी एकमुखाने महिला सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक जागरूकतेच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयक डॉ. किरण बोरकर मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांचे, महाविद्यालय प्रशासनाचे व सहभागी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक आभार मानले.