ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चांदा पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी फ्लाईंग ऑफिसर स्पंदन रोहनकरच्या प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट
चांदा पब्लिक स्कूलमध्ये भारतीय हवाई दलात (NDA – 154) एअरफोर्स फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड झालेल्या माजी विद्यार्थी स्पंदन रोहनकर यांच्या दोन दिवसीय प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संरक्षण क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली.
या कार्यशाळेदरम्यान स्पंदन रोहनकर यांनी हवाई दलातील निवड प्रक्रिया, शारीरिक व बौध्दिक तयारी, तसेच शालेय जीवनातील योग्य नियोजन यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे, शिक्षकवृंद आणि वर्ग 8वी ते 10वी चे विद्यार्थी उपस्थित होते.
स्पंदन यांनी निवड प्रक्रियेतील विविध टप्पे आणि स्वतःचा संघर्षमय प्रवास यावर मनमोकळेपणे विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी देखील स्पंदनशी संवाद साधतांना मनातील प्रश्न मनमोकळेपणे मांडले. स्पंदनने मिळवलेल्या यशाचे श्रेय शाळेला व आईवडिलांच्या पाठींब्याला दिले.
‘चांदा पब्लिक स्कूल मध्ये घेतल्या जाणा-या विविध उपक्रमांचा आणि क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे’, असे मनोगत त्याने व्यक्त केले. स्पंदनने शिस्त, सातत्य, शारीरिक आणि मानसिक तयारी याचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी, एन.डी.ए. व इतर सैनिकी भरती प्रक्रियेबद्दलही सखोल मार्गदर्शन केले.
संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी प्रमुख अतिथी स्पंदनचा सत्कार करत त्याच्या यशाचा गौरव केला आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी स्पंदनच्या यशाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी स्पंदनच्या यशाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
ही कार्यशाळा केवळ माहितीपर न राहता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ध्येय निर्धारण, देशसेवेबद्दल प्रेरणा आणि कठोर परिश्रमाची भावना निर्माण करणारी ठरली. चांदा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ही एक स्मरणीय व उपयुक्त शैक्षणिक पर्वणी ठरली.
Tags
चंद्रपूर