नालीचे वाहणारे पाणी ओंकार ले आउट मधील घरात शिरते : ले-आउट धारक त्रस्त
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील कुंभार बोडी ते विजासन मार्गे जाणाऱ्या नालीतील पाणी घोडमारे लॉन येथून मधातच ओंकार ले – आउट मध्ये साचत असुन ते पाणी घरात जात असल्यामुळे ले – आउट धारक त्रस्त झाले आहे.
या समस्येबाबत न.प मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन दिले मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
कुंभार बोडी ते विजासन या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम न.प. मार्फत केले आहे. याच मुख्य रस्त्यावर औकार ले – आउट असल्याने या नालीचे बांधकाम उंच असल्याने तसेच कित्येक दिवसापासून नालीचा उपसा न केल्याने घोडमारे लॉन परिसरात ही नाली चोकअप झाली असून येथील संपूर्ण पाणी ले -आउट धारकांच्या घरास शीरत असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच खुल्या जागेवर पाणी साचल्याने येथे संपूर्ण घाणीचे साम्राज्य तयार होऊन मोठ्या प्रमाणात मच्छराचे प्रमाण वाढले आहे. तसेच या पाण्याची दुर्गंधी सुद्धा पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार लक्षात घेता माजी नगरसेवक शोभा पारखी यांच्या नेतृत्वात न. प. मुख्याधिकारी यांना या समस्येबाबत निवेदन दिले व हि समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना माजी नगरसेवक शोभा पारखी,शोभाबाई बेलखुडे, रविकिरण राऊत, वैरागडे, मोहितकर, जोगी आदी उपस्थित होते.
[ तुम्ही नगरसेवक असताना काय केले ? ]
औंकार ले आउट येथील घाण पाण्याची समस्या घेऊन मुख्याधिकाऱ्याच्या दालनात माजी नगरसेवक शोभा पारखी गेले असता त्यांनी मुख्याधिकाऱ्याला वार्डाच्या समस्येबाबत सांगितले असता मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी त्याच नगरसेवकाला उलट प्रश्न करून तुम्ही नगरसेवक असताना काय केले हे काम मार्गी का नाही लावले असा अजब प्रश्न करून समस्या कडे दुर्लक्ष करण्याचे काम केले.
गेल्या दोन वर्षापासून न. प. वर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी असल्याने माजी नगरसेवकांचे काही चालत नसल्याने अशी अरेरावीची भाषा बोलली जात असल्याचे माजी नगरसेवक शोभा पारखी यांनी सांगितले.