ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोथली येथे शिवजयंती उत्साहात साजरी

एक गाव एक जयंतीचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

           स्थानिक बोथली येथील शिवराय सेना मंडळ, बौद्ध समाज कमिटी आणि नवयुवक गणेश मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

         सकाळपासूनच गावामध्ये जयंती उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले होते. एक गाव एक जयंती या संकल्पनेतून शिवजयंती महोत्सव २०२४ ची सुरुवात सकाळी आठ वाजता शिवाजी चौकात ध्वजारोहण व शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आले आणि त्यानंतर शिवाजी महाराज यांना वैचारिक मानवंदना देण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात युवा व्याख्याते साहिल रामटेके, समाजसेविका बबीता गेडेकर, समाजसेवक तथा अभ्यासक हिरालाल भडके आणि प्राध्यापक धनंजय गुरूनुले यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. शेखर प्यारमवार उद्घाटक म्हणून सरपंच सुशील नरेड्डीवार,कार्यक्रमाचे उपाध्यक्ष उपसरपंच विजय गड्डमवार,कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी सरपंच प्रकाश पा. गड्डमवार यांनी केले,तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी कुरेकार ,ग्राम पदाधिकारी कार्तिक मराठे, प्रज्ञा वाळके,वैद्यकीय अधिकारी पायल हुमने, उपस्थित होते.

      आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू दुर्गे यांनी केले संचालन पोलीस पाटील ताराचंद खोब्रागडे तर आभार सहाय्यक शिक्षक कोलते यांनी मानले,भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवराय सेना मंडळाचे पदाधिकारी,बौद्ध समाज कमिटी आणि नवयुवक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये