महेश नवमीच्या निमित्ताने उद्या (बुधवारला) शहरात भव्य शोभायात्रा

चांदा ब्लास्ट
महेश नवमी उत्सवाच्या निमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार, ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेमध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शोभायात्रेपूर्वी लक्ष्मीनारायण मंदिरात भगवान शंकराची आरती होईल, त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल.
महेश नवमीच्या शुभ अवसरावर माहेश्वरी चंद्रपूर तालुका संघटन, माहेश्वरी युवक मंडळ आणि माहेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये दाताळा येथील बिग बुल टर्फवर बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये महिलांनी आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
बालक आणि महिलांसाठी लिंबू शर्यत, बोरी शर्यत, संथ सायकलिंग अशा मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच कॅरम आणि बुद्धिबळ (शतरंज) स्पर्धांचाही यशस्वी आयोजन झाले. या सर्व उपक्रमांमुळे महेश नवमीचा उत्सव अधिक रंगतदार आणि आनंददायी ठरला. सर्व सहभागी आणि आयोजकांचे सहकार्य अत्यंत प्रशंसनीय राहिले.
या वेळी विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष दामोदरजी सारडा, जिल्हाध्यक्ष शिवनारायणजी सारडा, तालुका अध्यक्ष उमेशजी चांडक, सेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुशील मुंधडा, दिनेश बजाज, सुरेशजी राठी, तहसील सचिव राजेशजी काकानी, महिला मंडळ अध्यक्षा अल्का चांडक, पायल सारडा, युवक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सारडा, ऋषिकांत जाखोटिया, युवक मंडळाचे माजी अध्यक्ष शक्तिजी धूत, श्रवण मंत्री सुधीरजी बजाज आणि समाजबांधव राजकुमार जाजू यांची उपस्थिती होती. दि. ४ जून रोजी होणाऱ्या शोभायात्रेत अधिकाधिक समाजबांधवांनी सहभागी व्हावे.
असे आवाहन महेश नवमी उत्सवाचे प्रकल्प संचालक ललित कासट यांनी केले आहे.