ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारूविक्री, दारू बाळगणारे ईसमाना 2 वर्षाकरीता वर्धा जिल्ह्यातून हद्दपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहरातील पोलीस स्टेशन सावंगी मेघे, वर्धा शहर, रामनगर, परीसरात दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने शरीराविरूध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे संघटीत गुन्हेगार 1) अक्षय दिगांबर पटले 2) अजय उर्फ तोतल्या वासुदेव राठोड ३) रंजितसिंग उपंद्रसिंग थुरवाल सर्व रा. बोरगाव मेघे वर्धा 4) रोशन सुनिल लिडबे 5) सौरभ बोरकर दोन्ही रा. सावंगी मेघे वर्धा यांच्यावर पो.स्टे सावंगी मेघे कर्चा शहर पो.स्टे रामनगर या ठिकाणी शरीरा विरूध्द व मालमत्ते विरुध्द 30 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. नमुद आरोपी हे संघटीतपणे एकत्र येवून गुन्हे करण्याच्या सवईचे होते. त्यांच्यावर पायबंद घालण्याच्या उददेशाने तडीपारीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते.

त्याचप्रमाणे पो.स्टे सावंगी मेघे हद्दीत मौजा सालोड हिरापुर येथील राहणारे व संघटीतपणे अवैधरीत्या सराईत दारूवीकी करणारे शालू सुधिर खोब्रागडे वय 50 वर्ष व कांचन आकाश खोब्रागडे वय 32 वर्ष दोन्ही रा. सालोड हिरापुर ता.जि. वर्धा. यांचे विरुध्द पो.स्टे अभिलेखावर 40 पेक्षा जास्त दारूबंदी कायदयान्वये कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात आले तसेच त्यांचेवर वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करूणसुध्दा करण्यात आली आहे, तरी सुध्दा ते या कारवाईला न जुमानता त्यांचा अवैध दारू विकीचा व्यवसाय सुरूच होता. तसेच कायद्याचे चौकटीत जिवन व्यतीत करणारे सर्वसामान्य नागरीकांना त्यांचेपासून अत्यंत त्रास असल्याने त्यांच्यावर पायबंद घालण्याच्या उददेशाने नमुद आरोपीतांनवर तडीपारीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते, त्यामुळे ठाणेदार श्री संदिप कापडे पो.स्टे सावंगी मेघे यांनी वरील सर्व आरोपी यांचे विरूध्द कागदोपत्री कारवाई करून हद्द‌पारी प्रस्ताव मा. वरीष्ठांकडे सादर केला. त्यावरू मा. वरीष्ठांनी नमुद सर्व सात ही आरोपीतांना कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये 02 वर्ष कालावधी करीता वर्धा जिल्हयाचे बाहेर, भद्रावती, चंद्रपुर, नेर जि. यवतमाळ, मंगरूळ दस्तगीर जि. अमरावती येथे हद्दपार केले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी तसेच पो.स्टाफ पो.उप.नि. नबी शेख, कैलास खोब्रागडे, पो.हवा सतिश दरवरे, संजय पंचमाई, सचिन घेवंदे, अनिल वैदय, निलेश सडमाके, निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये