महसूल विभागाची धडक कारवाई
अवैध वाळू वाहतूक करणारे टीप्पर व ट्रॅक्टर पकडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रा. संजय खडसे,उपविभागीय अधिकारी,सिंदखेड राजा,मा.तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाचे पथकाने 2 मे रोजी रात्री साडे अकरा वाजता मौजे देऊळगाव मही येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅकर पकडून पोलीस स्टेशन देऊळगाव राजा अटकाव करून ठेवण्यात आले.
या पथकमध्ये – प्रवीण घोटकर नायब तहसीलदार, आकाश खरात व सुमित जाधव ग्राम महसूल अधिकारी, विठ्ठल हरणे महसूल सेवक यांनी सदर कारवाई केली. दिनांक 03/06/2025 रोजी सकाळी 6.00 वाजता टीप्पर क्रमांक MH 30 BD 5590 अंदाजे 5 ब्रास रेतिसह डोड्रा शिवार येथे पकडण्यात आले. सदर टिप्पर पो. स्टे देऊळगाव राजा येथे अटकाव करून ठेवण्यात आले आहे
या पथकमध्ये – प्रवीण घोटकर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी एन एल वायडे ग्रा. म. अधिकारी पि टी जायभाये, विठ्ठल हरणे महसूल सेवक पोलिस कर्मचारी श्री काकड यांनी सदर कारवाई केली.