ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे आठवडी बाजाराच्या दिवशी मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.

31 मे रोजी सायंकाळी चार वाजता फिर्यादी शेख मुजिब अब्दुल लतिफ यांचा विओ कंपनीचा अॅन्डराइड मोबाइल किंमत अंदाजे 19,000/- रुपयाचा आठवडी बाजार करित असतांना त्याचे पायातील चप्पल वर कोणाचा तरी पाय पडल्याने तो खाली पडला नंतर पाहिले असता मोबाइल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला.

चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरिक्षक नारायण गिते करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये