ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्धरात्रीत घुग्घुसमध्ये बॅनर जप्तीची अनोखी कारवाई, शहरात खळबळ

नगर परिषदेकडील कारवाई निष्पक्ष की राजकीय दबावाखाली?

चांदा ब्लास्ट

घुग्घुस नगर परिषदेकडील काही कर्मचाऱ्यांनी अर्धरात्री एक अनोखी कारवाई करत शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे. ही कारवाई २४ मेच्या रात्री व २५ मेच्या पहाटे सुमारे १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, घुग्घुसच्या इतिहासात प्रथमच नगर परिषदेकडून एवढ्या रात्री बॅनर जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बॅनर हा शहरातील एक प्रसिद्ध युवा भाजप नेत्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा नेता आरोग्य सेवक, गुरु, युवानेता अशा अनेक टोपणनावांनी ओळखला जातो. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी शहरात चर्चा मात्र जोरात सुरू आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सदर नेत्यानचा वाढदिवस २५ मे रोजी असून, त्यासाठी अनेक दिवसांपासून बॅनर लावण्याचे नियोजन सुरू होते. मात्र सध्या घुग्घुसमध्ये “एकदा बॅनर लागला की आठवडाभर काढला जात नाही” अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे जागा मिळणे कठीण झाले होते.

नागरिकांत प्रचंड नाराजी आहे कारण नगर परिषदेकडील अधिकारी सामान्यतः त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढताना दिसतात. शहरात कर वसुलीचे काम ठप्प आहे आणि अधिकारी निवडणुकीचे कारण सांगून जबाबदाऱ्या टाळताना दिसतात.

पण सामान्य नागरिकांकडून कर वसूल करताना मात्र कोणतीही कसूर केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत — ही कारवाई खरंच नियमांनुसार झाली आहे का, की कोणत्यातरी राजकीय दबावाखाली केली गेली?

आता यावर नगर परिषद किंवा संबंधित नेत्याकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या तरी ही घटना शहरात उत्सुकतेचा विषय ठरली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये