पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) हद्दीतील कुख्यात गुंड इसमावर एम. पी. डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) हद्दीतील इतवारा बाजार, वर्धा परीसरातील कुख्यात गुंड अमोल गणेश गेडाम वय ३२ वर्ष रा. इतवारा बाजार, वर्धा याचे विरुद्ध पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), रामनगर, सावंगी, सेवाग्राम, हिंगणघाटचे अभिलेखाबर सन २०११ पासून शरीरा विरुध्द, मालमत्ते विरुध्द तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकूण ४० गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणे, शस्त्रासह गैरकायद्याची मंडळी गोळा करून दंगा करून गृह अतिक्रमण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, शस्त्र बाळगुन गंभीर दुखापत करणे, साधीदारांसह मिळून खुनाचा प्रयत्न करने, टोळीने जबरी चोरी करणे, साथीदारांसह दरोड्याचा प्रयत्न करणे, घर पेटविण्याचे उद्देशाने आगळीक, महीलांचा विनयभंग करणे, अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे, अवैध दारुची विक्री करणे, प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये अवैधरित्या प्रवेश करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. त्या पैकी २५ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील १२ ते १३ वर्षापासुन स्थानबध्द ईसम नामे अमोल गणेश गेडाम रा. इतवारा बाजार, चर्चा याने पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), रामनगर सेवाग्राम बसावंगी परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवून सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. अमोल गणेश गेडाम रा. ईतबारा बाजार, वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम, सावंगी अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचे गुन्हेगारी गतिविधि थांबत नसल्याने त्याचे विरुध्द सन २०१५, २०१८ प सन २०२१ मध्ये कलम ११०(ई) फौजदारी प्रकासंहीता व सन २०१८ मध्ये ५५ मोका अन्वये २ वर्षाकरीता वर्धा जिलायातून हदपार करण्यात आले होते. तसेच सन २०२३ मध्ये एम.पि.डि.ए. कायद्यान्वये १ वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले होते. परंतु अशाप्रबंधक कार्ययोस सुध्दा तो जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, वां (शहर) यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीगाया हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यकतो. रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे पांध्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याचाबतचा प्रस्ताव मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हारंडाधिकारी तथा निहाधिकारी, वर्धा मा. नरेन्द्र फुलझेले यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा निहाधिकारी, वर्धा यांनी दिनांक १९ मे २०२५ रोजी स्थानचध्द आदेश जारी ककन त्यास अमरावती मध्यवती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्यास मध्यवती कारागृह अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
आगामी होणाय्या ग्राम पंचायत, जिल्हा परीषद निवडणुका निभीड व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अशा अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणान्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिलापंडाधिकारी तथा मित्हाधिकारी, वर्धा श्री. नरेना फुलझेले, तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग वीण, मांनी दिलाने आहे.
सन २०२४ मध्ये एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्यानवाद करण्यात आलेले आहे. तसेच सन २०१५ मध्ये अद्याप पावेतो ०८ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. पराग पोटे, पोउपनि शरद गायकवाड, पोलीस स्टेशन, वधां (शहर), पोलीस अंमलदार अमोल आत्राम, आशिष महेशगौरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पोलीस अंमलदार राजेश राठोड, महोला पोलीस अंमलदार वैशाली करमनकर, करीश्या परचाके पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांनी केली आहे.