ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनंता मिनासे यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील व्यावसायिक अतिश मिनासे यांचे वडील अनंता मिनासे यांचे दिनांक 23 मे रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले मृत्यु पश्र्चात त्यांचा मुलगा अतिश याने वडिलांचे मरणोत्तर ने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला, व जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा यांना याची माहिती दिली , जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमुने येऊन अनंता मिनासे यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते,

मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी,1 मुलगा,2 सूना,5 भाऊ,1 बहीन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वैकुंठ धाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सर्वच स्तरातील नागरिक उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये