देऊळगाव राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, प्रचंड नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यात 20 मे रोजी सायंकाळी सुसाट वाऱ्यासह वादळी पावसाने अनेक झाडे कोलमंडली, अनेकांचे पत्र उडाले यामध्ये दगडवाडी फाट्यावर सहा जण जखमी तर एक गंभीर देऊळगाव राजा तालुक्यात दुपारनंतर अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांची टिन पत्र उडाली तर काही घरांच्या भिंती कोसळल्या झाडे कोलमडली यामध्ये सहा जण जखमी झाले असून दोन जण गंभीर आहे याबाबत माहिती अशी की देऊळगाव राजा तालुक्यात दुपारी सुसाट वाऱ्यासह वादळी पाऊससुरू झाला यामध्ये बऱ्याच जणांचे घरावरचे टिन पत्र उडाली तर काहींच्या भीती कोसळल्या असेच दगडवाडी फाट्यावरची वाटिका हॉटेलवर चे टिन पत्र उडाले व भिंती कोसळल्याने पाण्यापासून व वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी वाटिका हॉटेलवर रूम मध्ये बरीच मंडळी बसली होती अशातच तीन पत्र उडून भिंत कोसळलेले विटांचा व दगडांचा मारा लागून सहा जण जखमी झाले यामध्ये प्रल्हाद जायभाये/ आदिनाथ जायभाये/ संजय उगले सिंदखेडराजा तसेच काही कामगार जखमी झाले असून शिंदखेड राजा येथील वेल्डिंग वाला गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला जालना येथे हलवण्यात आलेले आहे अशी माहिती मिळत आहे अनेक ठिकाणी झाडे कोलमडली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ,तसेच दगडवाडी फाट्यावरील पंकज लॉस यांची भिंत कोसळली असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. त्या ठिकाणी लग्नाची तयारी सुरू होती. मोठ्या प्रमाणात गर्दी होती परंतु सुदैवाने किरकोळ जखमी सोडले तर कुठल्याच प्रकारची हानी झाली नाही.
तसेच दगडवाडी येथील सौ सुमित्रा अरुण नागरे या शेतात असताना जवळच वीज पडल्याने किरकोळ जखमी झालेल्या आहे. पांगरी येथे नामदेव बापुराव वाघ यांच्या शेतात वीज पडून शाळूचा कडबा जळून खाक झाला, त्यामूळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.