मोटर सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मोटर सायकल चोरी झाल्याबाबत फिर्यादींचे रिपोर्टवरून पो.स्टे. दहेगाव येथे अज्ञात मोटर सायकल चोरट्याविरूध्द अप क्र. 142/2025 कलम 303(2) भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा चे पथक करीत होते. दि. 20/05/2025 रोजी तपासदरम्यान त्यांना मिळालेल्या गोपणीय खबरेवरून, आरोपी नामे सुभाष गौतम मस्के, वय 50 वर्ष, रा. वार्ड नं. 05 वायगाव (नि.), तह. देवळी यास ताब्यात घेत, गुन्ह्यासंबंधाने सखोल विचारपुस केली असता, आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल देत, तो यवतमाळ जिल्हा येथे त्याचेवर सुरू असलेल्या कोर्टाचे तारखेवर बसनी ज्यायचा व तेथुन परत येतांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटर सायकल चोरी करीत, खोटे कारण सांगुन त्या मोटर सायकल त्याचे परिचीत लोकांना गहाण व विक्री करीत होता, अशा प्रकारे आरोपीने वर्धा जिल्ह्यातील 03, यवतमाळ व इतर जिल्ह्यातील 10 अशा एकुण 13 मोटर सायकल जु.कि. 6,05,000 रू. चा चोरी केल्या असुन संपुर्ण मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी व जप्त 13 मोटर सायकल पुढील तपासकामी पो.स्टे. दहेगाव यांचे स्वाधीन करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, अमोल लगड, प्रकाश लसुंते, पो.अं. गिरीष कोरडे, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, मनीष श्रीवास, गजानन दरणे,रवि पुरोहित, विनोद कापसे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.