ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी पोलीसांनी रेती चोरी माफीया यांची रेतीची दोन ट्रॅक्टर पकडुन केली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक – 13/05/2025 रोजी सायंकाळी 20/50 वा. दरम्यान मिळालेल्या माहीतीवरुन मौजा सेलसुरा येथील नाल्यामधुन अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन वाहतुक होत आहे अशा माहीतीवरुन पो.स्टॉफ चे मदतीने सेलसुरा येथील नाल्याजवळुन येणाऱ्या रोडवर नाकेबंदी केली असता समोरुन दोन ट्रॅक्टर रेती भरुन येताना दिसले. यातील नमुद आरोपी ट्रॅक्टर चालक आकाश हेमराज नेहारे रा.मालोड हि. याने आपल्या ताब्यातील एक लाल रंगाचा महिंद्रा युवा टेक 575 DI कंपनीचा बिना नंबर ट्रॅक्टर मुंडा किंमत 5,00,000/-रु. व एक बिना नंबरची निळ्या रंगाची ट्रॉली किंमत 1,00,000/- रु. व त्यामधील अंदाजे 1 ब्रास रेती किंमत 7,000/- रु. असा एकुण किंमत 6,07,000/-रु. तसेच आरोपी ट्रॅक्टर चालक दिनेश शंकरराव उईके रा.सालोड हि. याने आपल्या ताव्यातील एक लाल रंगाचा महिंद्रा युवा टेक 575 DI कंपनीचा ट्रॅक्टर मुंडा क्र.एम.एच.32 ए.एच. 1143 किंमत 5,00,000/-रु. व एक विना नंबरची लाल रंगाची ट्रॉली किंमत 1,00,000/- रु. व त्यामधील अंदाजे 1 ग्राम रेती किंमत 7,000/- रु. असा एकुण किंमत 6,07,000/-रु. दोन्ही ट्रॅक्टर मध्ये काही रेती गौण खणीज अवैधरित्या भरुन नेत असताना मिळुन आल्याने त्याबाबत गौणखणीज काळी रेती बाबत कोणतीही रॉयल्टी नसताना मिळुन आला. एकुण जु. किं. 12,14,000/-रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर दोन्ही ट्रॅक्टर मालक 1) फिरोज उर्फ पप्पु इब्राहिम पठाण रा. सालोड हि, 2) प्रफुल उर्फ पप्पु दिलीप क्षिरसागर रा.सालोड हि. यांचे सांगण्यावरुन रेतीची वाहतुक केल्याचे आरोपी क्र.1 व 2 यांनी सांगितल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करुन चारही आरोपितांविरुद्ध पो.स्टे. सावंगी मेघे येथे अप.क्र.414/2025 कलम 303(2),3(5) BNS. सह कलम 130/177 मोवाका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्यामध्ये आरोपी यांचे ताब्यातुन एक लाल रंगाचा महिंद्रा युवा टेक 575 DI कंपनीचा विना नंवर ट्रॅक्टर मुंडा किंमत 5,00,000/-रु. व एक बिना नंबरची निळ्या रंगाची ट्रॉली किंमत 1,00,000/- रु. व त्यामधील अंदाजे 1 ब्रास रेती किंमत 7,000/- रु. असा एकुण किंमत 6,07,000/-रु. तसेच एक लाल रंगाचा महिंद्रा युवा टेक 575 DI कंपनीचा ट्रॅक्टर मुंडा क्र.एम.एच.32 ए.एच. 1143 किंमत 5,00,000/-रु. व एक बिना नंबरची लाल रंगाची ट्रॉली किंमत 1,00,000/- रु. व त्यामधील अंदाजे 1 ब्रास रेती किंमत 7,000/- रु. असा एकुण किंमत 6,07,000/-रु. दोन्ही ट्रॅक्टर व रेतीसह जु.किं. 12,14,000/-रु चा मुद्देमाल आरोपितांकडुन जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक साहेव सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेबयांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक मंदिप कापडे साहेब ठाणेदार पो.स्टे. सावंगी मेघे यांचे निदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि.गोपाल शिंदे सा. पोहवा. सतिश दरवरे, संजय पंचभाई, निलेश सडमाके, अनिल वैद्य, पो.शि. अमोल जाधव यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये