सावंगी पोलीसांनी गोवंश जनावरे कत्तलीकरीता घेवुन जाणारे वाहन पकडुन केली कार्यवाही.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक. 11/05/2025 रोजी रात्री 22/15 वा. दरम्यान मिळालेल्या माहीतीवरुन मौजा सालोड हि. ते पुलगाव कडे जाणाऱ्या रोडने एक बोलेरो पिक अप गाडी क्र.एम.एच.27 बी.एक्स. 9518 मध्ये जनावरे कोंबुन नेत आहे. अशा माहीतीवरुन पो.स्टॉफ चे मदतीने मौजा दहेगाव स्टेशन येथील रोडवर नाकेबंदी केली असता समोरुन एक बोलेरो गाडी येताना दिसली. तिला थांबवुन खबरेप्रमाणे बोलेरो पिक अप गाडी क्र.एम.एच.27 बी.एक्स. 9518 असल्याचे दिसल्याने सदर गाडी मधील चालक व त्याच्या बाजुला बसुन असलेला व्यक्ती यांनी आपले नाव 1) सारंगधर प्रल्हादराव जवडे 2) प्रल्हाद हरिभाऊ जबडे दोन्ही रा. सोनेगाव खर्डा ता. धामणगाव जि. अमरावती असे सांगितलेवरुन पंचासमक्ष गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये तीन गाई व एक बैल यांना वेदना होइल अशा रितीने वाहनात कोंबुन तसेच त्यांच्या तोंडाला मोरके बांधुन विना पास परवान गोवंश जनावरे कत्तलीकरीता वाहतुक करताना मिलुन आल्याने जनावरे व बोलेरो गाडी असा जु. किं. 4,85,000/-रु.चा मुद्देमाल जप्ती पंचनाम्यानुसार कार्यवाही करुन मिळुन आल्याने दोन्ही आरोपितांविरुद्ध पो.स्टे. सावंगी मेघे येथे अप.क्र.411/2025 कलम 5 (अ), (1), 5 (ब), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1976 सह कलम 11 (1), (ड), (फ) भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविणे प्रतिबंधक अधि. 1960 सह. कलम 119 मपोका. सह. कलम 83/177 मोवाका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी यांचे ताब्यातून तीन गाई व एक बैल किंमत 85,000/-रु. व एक बोलेरो पिक अप गाडी क्र.एम.एच.27 बी.एक्स. 9518 किंमत 4,00,000/- रु जु. किं. 4,85,000/-रु चा मुद्देमाल आरोपितांकडुन जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेव, अप्पर पोलीस अधिक्षक साहेव सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेवयांचे मार्गदर्शनात सहा. पोलीम निरीक्षक संदिप कापडे साहेब ठाणेदार पो.स्टे. सावंगी मेघे यांचे निदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. कैलास खोब्रागडे सा. पोहवा. सतिश दरवरे, संजय पंचभाई, निलेश सडमाके, अनिल वैद्य, पो.शि.अमोल जाधव यांनी केली.