ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थांची विक्री., आरोपी ताब्यात

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि अनिल आळंदे हे पोलिस स्टेशनला हजर असताना व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘निखिल अशोकराव भोकरे वय 20 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल नि त्याचेजवळ मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने बाळगुण जाम कडून हिंगणघाट कडे वाहतूक करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर सा. यांना देवून त्याचे आदेशाने हिंगणघाट परिसरात मौजा रिमडोह येथे पोस्टाँप सह रवाना होवून नॅशनल हायवे क्रमांक 44 येथील हनुमान मंदीरा जवळ नाकेबंदी केली असता.,

  खबरेप्रमाणे एका मोटरसायकल वर हिरव्या रंगाचा शर्ट घालून असलेला जाम कडून सर्विस रोडने येताना दिसून आल्याने सदर मोटरसायकल चालक यास पंचासमक्ष सापळा रचून सदर इसमांस ताब्यात घेउन मोटर सायकल चालक यास विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव, पत्ता, निखिल अशोकराव भोकरे वय 20 वर्ष व त्याच्या मागे बसलेल्या इसमाने आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे वय 34 वर्ष दोन्ही रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट .जि. वर्धा असे सांगीतले. पंचासमक्ष त्यांची कायदेशीर रित्या अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये मोटर सायकल चालक निखिल अशोकराव भोकरे याच्या पॅन्टच्या खिशात 1)एका प्लॅस्टीकच्या पन्नी मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकुण ल्पॅस्टीक पन्नीसह वजन 6.55 ग्रॅम किंमत 18, 390 रु 2) हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस विना क्रमांकाची किंमत 90,000 रू. असा एकुण जुमला किंमत 1,08,390/- रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर नावाचा अमली पदार्थ जप्त करून एनडीपीएस कायदयान्वये दोन्ही आरोपीतांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. निर्दशानुसार मा. देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आळंदे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे सायबर शाखा वर्धा येथील पो. हवा अनुप कावळे,नापोका गोविंद मुंडे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये