ताज्या घडामोडी

राष्ट्रीय महामार्गावर ऑइलचा सडा – दहा किलोमीटर परिसरातील रस्ता झाला निसरडा

कित्येक दुचाकीस्वार घसरून कोसळले - पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर माती टाकणे केले सुरू

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा आसिफाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरूर रोड ते राजुरा जवळपास दहा किलोमीटरच्या पट्ट्यात मध्यरात्री ऑईल सदृश्य द्रव पदार्थ अथवा ग्रीस सांडल्यामुळे संपूर्ण महामार्ग निसरडा झाला असुन ह्या भागात सकाळपासून जवळपास 150 पेक्षा जास्त दुचाकीस्वार पडले.

प्रस्तुत प्रतिनिधीला घटनेची माहिती कळताच सकाळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितिची प्रत्यक्ष बघितली असता रेल्वे गेट ते पंचायत समिती दरम्यान कित्येक दुचाकी वाहन स्लिप झाल्याने नागरिक रस्त्यावर पडले. सदर महामार्ग वर्दळीचा असून ह्यामार्गाने तेलंगणा येथून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. अशातच अचानकपणे दुचाकी रस्त्यावर पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस तसेच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली तसेच ॲड. शंतनु देशमुख ह्यांचेसह नगर पालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर माती टाकण्याचे कार्य सुरू केले होते. त्याचप्रमाणे प्रस्तुत प्रतिनिधी व काही जागरूक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ प्रयत्न करून वाहने थांबवुन वेग कमी करण्याची विनंती करून संभाव्य धोक्याची कल्पना दिली.

नगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील जमादार पुणेकर तसेच किशोर वरवाडे ह्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण करून रस्त्याच्या शेजारी असलेली माती व रेती ऑईल वर पसरून अपघात टाळण्यासाठी मोलाचे कार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये