पशुसंंवर्धन विभागाच्या व्यक्तिगत योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तीक लाभाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार, युवक युवती व महीलानी ऑनलाईन पद्धतीने एक जुन पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा.आशुतोष सपकाळ,सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार व पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. दीपक बहानिया यांनी केले आहे.
राज्य व जिल्ह्यस्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी- म्हैसीचे गट,शेळी-मेंढी गट,एक हजार मांसल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे,शंभर कुक्कुट पिलाचे वाटप व पंचविस तीन तलंग गटवाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2025-26 या वर्षांत राबविली जाणार आहे.पशुपालकांना दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कुटपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अर्ज भरताना अर्जदाराने नोंद विलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोण त्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलु नये व मागील वषीॅ अर्ज केलेल्या अर्जदाराने पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्ज संकेतस्थळ https//.Mahabma.com अँड्रॉइड मोबाईल अँड्रॉइड Ah -Mahabms app Google play store वर मोबाईल अँपवर उपलब्ध आहे.टोल फ्री क्रमांक – 1962 व 18002330418 आहे.याबाबत काही अडचणी असल्यास पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व तालुक्यातील नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.