आयुधनिर्माण कर्मचाऱ्यांचे काळी फीती बांधून आंदोलन
मागण्यांचे निवेदन केले अधिकाऱ्यांकडे सादर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
देशातील आयुधनिर्माण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी यांनी घोषित केलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.11) संरक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कार्यालयात आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी काळी फित बांधून आपला निषेध नोंदवला आणि एक संयुक्त निवेदन उच्च अधिकाऱ्यांना सुपूर्त केले.
एनपीएस आणि यूपीएस रद्द करून फक्त जुनी पेन्शन योजना लागू करावी. ओएफबी डिम्ड डेप्युटेशन कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी प्रसार भारती मॉडेलप्रमाणे सेवानिवृत्त होईपर्यंत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कायम ठेवाव्यात. डीपीएसयूमध्ये सेवा अटींचा भंग आणि कामकाजाच्या परिस्थितीत होणारी घसरण थांबवण्यासाठी उच्चस्तरीय हस्तक्षेप व्हावा. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून सादर केलेले निवेदन स्वीकारले आणि ते त्वरित उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवले जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे सदस्य आणि कोअर कमिटीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात अश्विन जिवाने, विकास पाठक, उल्लास नागराळे, प्रणय वाघमारे, पंकज चौधरी, शशि कुमार, राम मोहन पाल, पुरेन्द्र कतारे, खाडे, नितेश साहू, खुशाल रामटेके, आकाश यादव, विश्वास, घनश्याम, घनश्याम पुण्डे, संतोष प्रजापती, सचिन राऊत आणि राजदीप यांनी आंदोलन यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय अनेक समर्पित सदस्यांनी काळी फित बांधून आपला पाठिंबा दर्शविला आणि एकत्रितपणे आपला आवाज बुलंद केला. हे आंदोलन संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेसाठी आणि पेन्शन अधिकारांच्या पुनर्बहालीसाठी सुरू असलेल्या संघटित लढ्याचा एक भाग असून, सरकार योग्य ती कार्यवाही करेपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू राहणार आहे.