
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 8/03/2025 रोजी तक्रारदार सुनिल मुरलीधर सुर्यवंशी रा. स्वागत काॅलनी वर्धा हे कारला चैक येथील ए. टि. एम. मघ्ये पैसे काढण्यास गेले असता तेथे हजर दोन इसमांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे जवळील ए. टि. एम. काॅर्ड हातचालाखीने बदलवून त्यांचे खात्यातून नगदी 43,000/-रू. काढून फसवणूक केली. अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरून पो. स्टे. रामनगर जि. वर्धा येथे अज्ञात व्यक्तींविरूध्द विवीध कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासावर होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व सायबर सेल वर्धा मार्फतीने करीत असतांना दि. 03/01/25 रोजी पुलगाव येथे सुध्दा अशाच प्रकारे ए. टि. एम. काॅर्ड हातचालाखीने बदलवून तक्रारदार महिला यांची फसवणूक केल्याची माहीती समोर आली. सदर दोन्ही घटनास्थळांची पाहणी करून व तांत्रीक माहीतीचे अवलोकन करीत सदर घटनास्थळी मिळून आलेले संशयित ईसम यांची माहीती घेतली असता सदर संशयित हे प्रतापगढ (उत्तर प्रदेष) येथील असून त्यांनीच वर्धा जिल्हयातील दोन्ही गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रतापगड उत्तर प्रदेश येथे जाऊन आरोपी निष्पन्न करून सापळा रचून सदर गुन्हयातील आरोपी नामे अकिल अहमद वकिल अहमद, वय 24 वर्ष, रा. गंभीरपूर त. रानिगंज जि. प्रतापगढ यास रानिगंज उत्तरप्रदेष येथून ताब्यात घेवून त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार नामे 1. दानिश मोहम्मद दानिश साबित अली, रा. सोंनबरसा, कोहडोर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश पोलीस स्टेशन कोहडोर 2.शफिक रायसुल्ला राहणार खामपूर जिल्हा प्रतापगड यांचे सह पुलगाव व रामनगर वर्धा येथे येवून सदर गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर आरोपी याचे ताब्यातून गुन्हयात फसवणूक करून चोरी केलेले नगदी 8,000/-रू. व मोबाईल तसेच दुस-याचे नावे असलेले ए. टि. एम. कार्ड असा एकुण 28,000/-रू. चा मुद्देमाल जप्त करून सदर दोन्ही गुन्हे उघड केलेले आहेत तसेच उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. सदर आरोपी याचे कडून याव्यतीरीक्त अशाप्रकारे फसवणूकीचे आणखी बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई श्री अनुराग जैन साहेब पोलीस अधीक्षक वर्धा, मा. सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि सलाम कुरेशी, पोलिस अंमलदार सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, दिनेश बोथकर, विशाल मडावी,अनुप कावळे, अंकीत जिभे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.