ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकास विद्यालयातील प्रथमेश वाकडेचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

दरवर्षी विविध शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जाते त्याचप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात लोकसेवा मंडळ विहिरगाव द्वारा संचालित विकास विद्यालय तथा विकास कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता. सावली जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थी प्रथमेश पुंडलिक वाकडे हा शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला आहे. सदर विद्यार्थ्याला वर्ग बारावीपर्यंत 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

प्रथमेशच्या यशाबद्दल लोक सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि प्राचार्या कु. गराटे मॅडम मार्गदर्शक शिक्षक पूरेल्लीवार सर, मुरकुटे मॅडम आणि पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्याला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये