अनाधिकृत कर वसुली संदर्भात नगर परिषद हद्दीतील पथविक्रेत्यांना दिलासा
माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या पुढाकाराने पथविक्रेत्यांना दिलासा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी नगर परिषद क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व जुन्या नगर परिषद परिसरातील बाजाराचा लिलाव करण्यात आला. नगर परिषदेच्या वतीने शहरातील सदर बाजाराचा कंत्राट मंजूर झाला.
परंतु नुकत्याच निघालेल्या अधिसूचने नुसार शहरातील सर्व पथविक्रेत्यांकडून कर वसुली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील इतर भागातील बाजाराचा लिलाव झाला नसतांना इतर पथविक्रेत्यांकडून वसुली करणे अनाधिकृत आहे.
या संदर्भात पथविक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांची भेट घेत समस्या सोडविण्या संदर्भात चर्चा केली. या संदर्भात माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी नगर परिषद येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पथविक्रेत्यांना दिलासा मिळवून दिला.
या बैठकीत भाजपा तालुका महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज वठे, भाजपा पदाधिकारी अमित रोकडे यांच्या सह पथविक्रेते उपस्थित होते.