अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडने बोलक्या चित्रानी रंगविली शाळा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जवळपास असलेल्या गांवातील मुलं चांगली शिकावीत व प्रगती करावी या साठी सतत शाळेत नव नवीन उपक्रम अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कडून आपल्या सीएसआर अंतर्गत राबविले जात आहेत.
यावेळेस माणिकगड सीएसआर कडून माईन्स लगत असलेल्या गोवारीगुडा गांवातील सरकारी शाळेला बोलक्या चित्रानी व अभ्यासक्रमतील विषयानी रंगविण्यात आलीत.
यामध्ये पाणी वाचवा, झाडे लावा, हात स्वच्छता पोषक आहार, शरीराचे अवयव, अल्फाबेट्स, रंगांची ओळख, जलचक्र, भौमितिक आकार, राज्य व जिल्हाची ओळख, दिवसाची ओळख अंकाची ओळख तसेच शाळेची ओढ लागणारे चित्र काढण्यात आलेत.
तसेच शिक्षकांच्या गरजेचे सर्व नियम लिहण्यात आलेत.या रंग रांगोटीने शाळेला दुरून बघताच गांवतील लोक त्याकडे आकर्षित होत आहेत.
सर्व शिक्षक, पालक व गांवकरण्यानी या कार्याची मनसोक्त स्तुती केलीत तर विष्णू रामदास बडे मुख्याध्यापक व शिवाजी शंकर पवार स.शिक्षक यांनी नी या कार्याबद्दल माणिकगढचे आभार मानलेत.