विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधीं उपलब्ध : प्रा. गीतेश बुरांडे
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात "मल्टिमीडिया सिस्टीम" विषयावर व्याख्यान

चांदा ब्लास्ट
एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर आवारात दिनांक ०१ एप्रिल २०२५ रोजी ‘मल्टिमीडिया सिस्टीम’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला प्रा.गीतेश बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मल्टिमीडिया सिस्टीमच्या विविध घटकांचा परिचय करून देत, त्याचे वापर आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा केली.
विद्यार्थ्यांना यशस्वी करियरच्या दृष्टीने विविध तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल प्रेरणादायक विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले , सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मल्टिमीडिया सिस्टीमची महत्त्वपूर्ण माहिती आणि त्याची तंत्रज्ञानिक उपयोगिता यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. राजेश इंगोले यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सदर विषयावर अधिक अभ्यास करण्याचे आणि त्यातले नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, डॉ. वेदानंद अलमस्त यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संधींचा उपयोग करण्याचे संकेत दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका आश्विनी डांगेरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन आश्मिता चव्हाण हिने केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना मल्टिमीडिया सिस्टीमसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल ज्ञान मिळाले. प्रा. गीतेश बुरांडे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना यशस्वी करियर साध्य करण्याची प्रेरणा मिळाली.