भंगाराम वार्ड हत्याकांडातील नऊ आरोपींना पोलिसांकडून अटक
आरोपींची संख्या बारावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भंगाराम वार्ड येथील अमर कुळमेथे या 22 वर्ष युवकाच्या हत्त्या प्रकरणी आणखी नऊ आरोपींना भद्रावती पोलिसांनी दिनांक 31 रोजी सोमवारला चंद्रपूर येथील बस स्थानक परिसरातून अटक केली आहे. त्यामुळे या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता बारा वर पोहोचली आहे.
यापूर्वी हत्याकांडातील आकाश अरुण सिडाम,वय 32 वर्ष, क्रिश उर्फ लक्की रवींद्र मरसकोल्हे, वय 21 वर्ष व प्रवीण उर्फ बंटी गेडाम वय २७ वर्ष या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रतीक प्रकाश गेडाम व 28 वर्षे, प्रभाकर घुलाराम गेडाम वय साठ वर्षे, आकाश शालिक मरसकोल्हे वय 34 वर्षे ,प्रथम प्रभाकर गेडाम वय 21 वर्ष,पुरभ सुधाकर सिडाम वय ३७ वर्ष, प्रशांत बलदेव गेडाम वय 22 वर्ष, त्रिशूल कवडू मरस कोल्हे वय 30 वर्ष, शैलेश श्रावण आत्राम वय 21 वर्षे यांच्यासह फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी शुभम अशोक इंगोले व 28 वर्षे सर्व राहणार भंगाराम वार्ड यांना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे गजानन तूपकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, अनुप आष्टुनकर, योगेश घाटोळे, रोहित चिटगिरे, महेंद्र बेसेकर व खुशाल कावळे यांनी केली.